उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून 'शिवगर्जना अभियान'

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून 'शिवगर्जना अभियान'

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेनेत पडलेली ऐतिहासिक फूट आणि या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेले पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यामुळे खचलेल्या राज्यभरातील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना उभारी देऊन देऊन त्यांच्यात नवचैत्यन्य निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी आज, शनिवारपासून राज्यभरात 'शिवगर्जना अभियान' राबविण्यात येणार आहे. ठाकरे यांनी ३ मार्च २०२३ पर्यंत चालणाऱ्या या अभियानाची जबाबदारी ठाकरे गटाच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपांना आणि टीकेला उत्तर दिले जाणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र ढवळून काढण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com