Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याखासदार संजय राऊतांना न्यायालयाचा दणका; ठोठावला 'इतक्या' रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

खासदार संजय राऊतांना न्यायालयाचा दणका; ठोठावला ‘इतक्या’ रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना शिवडी न्यायालयाने (Shivdi Court) मोठा दणका दिला आहे. राऊत आज न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्याने त्यांना न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

- Advertisement -

लढवय्या नेता हरपला! भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात केला होता.

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजले! मतदान कधी? निकाल कधी?; वाचा एका क्लिकवर

त्यानंतर सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या (Dr. Medha Somaiya) यांनी राऊतांविरोधात अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर न राहिल्याने संजय राऊतांना हा दंड (Penalty) ठोठावण्यात आला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर मान्यवरांकडून श्रद्धांजली

दरम्यान, संजय राऊत यांनी या प्रकरणाचा कुठलाही पुरावा नसताना सोमय्या कुटुंबियावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यावेळी किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. तसेच राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest warrant) देखील जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता राऊतांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या