Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्या...अन्यथा स्मार्ट सिटीला 'शिवसेना स्टाईल दणका'; नाशकात शिवसैनिक आक्रमक

…अन्यथा स्मार्ट सिटीला ‘शिवसेना स्टाईल दणका’; नाशकात शिवसैनिक आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात स्मार्ट सिटी (Smart City) अंतर्गत खोदून ठेवलेले काँक्रीट रस्ते, पाईपलाईन व ड्रेनेज लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने स्मार्ट सिटीच्या (Smart City) कारभाराविरोधात आंदोलन (Agitation) करेल, असा इशारा शिवसेना (Shivsena) नेते तथा माजी मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी दिला आहे…

- Advertisement -

स्मार्ट सिटीने (Smart City) सुरू केलेली कामे वेळेत पूर्ण न झाल्यास शिवसेना स्मार्ट सिटी कार्यालयाला टाळे लावल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

बोरस्ते यांनी आज स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Sumant More) यांना मागण्यांचे निवेदन सादर करून आंदोलन झाल्यास त्याची सर्व जबाबदारी स्मार्ट सिटीचीच राहणार असल्याचे सांगितले.

स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात मागील काही दिवसात काँक्रीट रस्ते, ड्रेनेज लाईन तसेच पाईप लाईन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले. गोळे कॉलनी, घारपुरे घाट येथील काँक्रीट रास्ता आदी कामांचा समावेश आहे. कामे सुरू केली असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. तर ठेकेदार काम करत नसल्याचे करण सांगण्यात येत आहे. ठेकेदार काम का करत नाही, याचा खुलासा करावा, अशी मागणी अजय बोरस्ते यांनी केली आहे.

पावसाळ्यात गोदरच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. शहराच्या अत्यंत रहदारीच्या आणि महत्वाच्या ठिकाणांची कामे आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा तसेच पार्किंगचा त्रास नाशिककरांना सहन करावा लागतो. जनतेला या पाण्यातून वाट काढून पुढे जावे लागते, या परिस्तितीत रस्त्यावर खोदून ठेवलेल्या खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अपघात होऊ शकतो, याला सर्वस्वी स्मार्ट सिटी मंडळ जबाबदार राहील.

– अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते, नाशिक मनपा.

- Advertisment -

ताज्या बातम्या