शिवतीर्थावर गर्दी होणारच, नीलम गोऱ्हेंचे नाशकात विधान

शिवतीर्थावर गर्दी होणारच, नीलम गोऱ्हेंचे नाशकात विधान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेना नेत्या व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला...

यावेळी त्या म्हणाल्या की, सध्या राज्यभरात 'दार उघड बये' अभियान सुरू आहे. महिलांना न्याय मिळावा, संधी मिळावी यासाठी 61 मंदिरात महिला जाऊन दर्शन घेणार आहे. चांदवड आणि सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन तेथील प्रसाद शिवतीर्थावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे...

त्या पुढे म्हणाल्या की, कोणाला कितीही तयारी करू द्या, आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर (Shivtirtha) गर्दी होणारच आहे. तसेच मनातील उर्मी ज्यांच्याकडे आहे, ते सर्व शिवतीर्थावर येणारच आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray) पाठीशी असलेले सर्वच शिवसैनिक हे शिवतीर्थावर येतील, असे त्या म्हणाल्या.

शिवतीर्थावर गर्दी होणारच, नीलम गोऱ्हेंचे नाशकात विधान
Navratrotsav 2022 : नाशिकमधील 'या' दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर...

तसेच शेतकरी आत्महत्या असे प्रश्न आहेत, इगतपुरीत कातकरी समाजाच्या मुलीचे अपहरण केले जाते. कामाला जुंपले जाते, याचा अहवाल पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागितला होता, मात्र अद्याप दिला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवतीर्थावर गर्दी होणारच, नीलम गोऱ्हेंचे नाशकात विधान
काहीशा उघडीपीनंतर 'तो' पुन्हा येणार

नाशिक प्रमाणे नवी मुंबई डोंगर असून ते नष्ट होत आहेत. सर्व प्रकल्प अनुत्तरित राहिले तर काम कशी होणार, सर्वसामान्य आमदारांना निधी मिळत नाही, शिवभोजन, डीपीडिसी निधी नाही. किरकोळ माणसाच्या बोलण्यावर उत्तर देऊ नका असा सल्ला मला एकाने दिला आहे, असा टोला यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे. तुम्ही तयार असाल तर निवडणुकीला सामोरं जा, असे आव्हानही यावेळी त्यांनी दिले.

शिवतीर्थावर गर्दी होणारच, नीलम गोऱ्हेंचे नाशकात विधान
Navratrotsav 2022 : सप्तशृंगी देवीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

थापा यांच्यासंदर्भात त्या म्हणाल्या की, थापा संदर्भात काय भाष्य करणार, थापा साधा माणूस, त्याची दिशाभूल होऊ शकते, कुठे तरी त्यांचा गैरसमज झाला असेल, मुख्यमंत्री शिंदे यांचा गैरसमज झाला अस मला वाटत. त्यांची न्यूसेसन व्हॅल्यू कमी झाल्यावर भाजप त्यांची काय अवस्था करेल याचा त्यांनी विचार करावा, असे आवाहन देखील यावेळी गोर्हे यांनी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com