संजय राऊत
संजय राऊत

वर्षभरात जे जे साचले तेच पक्षप्रमुख ठाकरे बोलतील

शिवसेनाचा आज दसरा मेळावा

मुंबई

वर्षभरात जे जे साचले होते ते ते आज पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे एक एकाचा समाचार घेतील, असे सूचत वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न होता सभागृहात होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत सगळीकडेच चर्चा आहे. तर, विरोधी पक्ष असलेला भाजपला लक्ष्य करणार का, असेही विचारले जाते आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही.मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोललो होतो की मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. त्यामुळे आजचा दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असेल.

यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री भाजपाला टार्गेट करणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, कोरोना नसता तर शिवतीर्थ अपुरं पडलं असतं. दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतील हे तुम्हाला संध्याकाळी समजेलच. लसीचं राजकारण करण्याइतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत. व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलणार नाहीत, तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com