राहुल शेवाळे यांचा मानहानीचा दावा; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा संबंध नाही

राहुल शेवाळे यांचा मानहानीचा दावा; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा संबंध नाही

मुंबई | प्रतिनिधी

सामना वृत्तपत्रातून बदनामी कारक वृत्त प्रसिध्द झाल्याने शिंदे शिवसेना गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी दाखल केलेल्या १०० कोटी मानहानी दावाशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा काही संबंध नाही. पीआरपी कायद्यानुसार वृत्तांची निवड करणे आणि प्रसिध्द झालेल्या वृत्ताची जबाबदारी ही अतुल जोशी यांची आहे असा दावा अ‍ॅड.मनोज पिंगळे यांनी केला .

सामना या मुख्यपत्रातून खासदार शेवाळ यांच्या विरोधात २९ िउसेबर २०२२ रोजी आक्षेपार्ह वृत्त प्रसिध्द करण्यात आले. शेवाळ यांचा पाकिस्तान मध्ये रियल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये राहुल शेवाळे यांचा सहभाग असल्याचे वृत्त प्रशिद झाले होते. याप्रकरणी शेवाळ यांनी माढगांव नयालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दोषमुक्ततेसाठी अर्ज केला आहे.

या अर्जावर दंडाधिकारी एस. बी. काळे यांच्यासमोर समोवारी सुनावणी झाली. यावेळी ठाकरे आणि राऊत यांच्यावंतीने अ‍ॅड मनोज पिंगळे यांनी युक्तीवाद केला. या खटल्याशी ठाकरे आणि संजय राऊत यांचा काहीही संबध नाही. पीआरपी कायद्यानुसार वृत्तांची निवड करणे आणि प्रसिध्द झालेल्या वृत्ताची जबाबदारी ही अतुल जोशी यांची आहे.

त्यामुळे ठाकरे आणि राऊत यांनी या खटल्यात दोषी धरता येणार नाही. असा दावा करताना सर्वाच्च न्यायालयाच्या निवाड्याचा संदर्भ दिला. याला राहुल शेवाळे यांच्यावतीने अ‍ॅड चित्रा साळूंखे यांनी अर्जालाच जोरदार आक्षेप घेेत युक्तीवाद करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयाने शेवाळे यांनी वेळ देत सुनावणी २० ऑक्टोंबर पर्यंत तहकूब ठेवली.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com