अंगावर आलात तर...; खासदार गोडसेंना शिवसेना पदाधिकार्‍यांचा इशारा

शिवसेना
शिवसेना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वतःचा चेहरा नसलेले हेमंत गोडसे (MP Hemant Godse) आतापर्यंत शिवसेनेचा (shiv sena) मुखवटा लावून फिरत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (Maharashtra Navnirman Sena) शिवसेनेमध्ये येण्यासाठी त्यांनी दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांना लोटांगण घातले होते.

राऊतांनी त्यांना पक्षात प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारीही दिली. शिवसैनिकांच्या जीवावर गोडसे निवडून आले. त्यामुळे राऊतांवर टीका करणे म्हणजे गोडसेंनी (MP Hemant Godse) स्वतःची अवहेलना करून घेणे आहे. गद्दारी केव्हा मोडून काढायची हे आम्हाला ठाऊक असून शिवसैनिक (shiv sainik) गोडसेंना गावांमध्ये फिरू देणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर गोडसे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर (Shiv Sena District President Vijay Karanjkar) यांनी परखड शब्दात प्रत्युत्तर दिले.

आम्हाला खोलात शिरायला ना भाग पाडू नका. ’अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’, असा शिवसेना स्टाईल इशाराही पत्रकार परिषदेतून देण्यात आला. शिवसेना पदाधिकार्‍यांनी शालिमार (shalimar) येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनहेमंत गोडसे यांच्या टिकेचा समाचार घेतला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Metropolitan Chief Sudhakar Badgujar), माजी महापौर विनायक पांडे (Former Mayor Vinayak Pandey), वसंत गिते (vasant gite), पदाधिकारी विलास शिंदे आदी उपस्थित होते. राज स्टाईल शिवसेनेचा ’लाव रे तो व्हिडीओ’ !

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray), शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया यावेळी दाखविण्यात आली. ’गद्दार’ असा उल्लेख करून करण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या टिकेत गोडसे वाणात अन गुणातही नाही, गोडसेंनी शिवसेना वाढवण्यापेक्षा स्वतःच्या प्रॉपटी वाढविल्या,

शिंदे गटातील कांदे, भुसे, गोडसेंचे तोंड वेगवेगळ्या दिशेला, गोडसे शिवसेनेच्या नगरसेवकांना आमिष दाखवित आहेत मात्र कुणीच गळाला लागेना, द्राक्ष, कांदा निर्यातबंदीबाबत गोडसेनी आवाज उठविला नाही. जेथे सत्ता तेथे खासदार गोडसे जातात. आगामी निवडणुकीत गोडसेंचे डिपॉजिट जप्त करू असाही इशारा यापत्रकार परिषदेत देयात आला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com