संजय राऊत यांचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज; दिलासा मिळणार?

संजय राऊत यांचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज; दिलासा मिळणार?

मुंबई | Mumbai

मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या (ED) अटकेत असलेले शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने १९ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com