शिवसेना आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, राणेंसंदर्भात म्हणाले...

शिवसेना आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, राणेंसंदर्भात म्हणाले...
शिवसेना

हिंगोली

राज्यातील वादग्रस्त वक्तव्यांची धग अजून थांबयला तयार नाही. आता शिवसेनेच्या आमदाराने केंद्रीय मंत्री नारायण राणे संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे या वादाला आता काय वळण लागते आणि भाजप (BJP) काय भूमिका घेतो हे महत्त्वाचे आहे.

शिवसेना आमदार संतोष बांगर (Shiv Sena MLA Santosh Bangar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

शिवसेना
भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, किरीट सोमय्यांंचा दावा

आमदार संतोष बांगर हे शिवसेना पक्षाचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. राणे यांच्याबाबत बोलताना त्यांची जीभ घसरली.शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या विधानावरुन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हिंगोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली आहे.

काय म्हणाले आमदार बांगर ?

''अरे तू काय सांगतो कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. पोलीस संरक्षण थोडसं बाजूला कर. हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केलं, तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर म्हणू नको.”

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com