शिवसेना आमदाराने शरद पवारांविरुद्ध दंड थोपटले: मागितला या पदाचा राजीनामा

शिवसेना आमदाराने शरद पवारांविरुद्ध 
दंड थोपटले: मागितला या पदाचा राजीनामा
शरद पवार

राज्यातील महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi)सदस्य असलेल्या शिवसेना (shiv sena)आमदाराचे आघाडीचे प्रणेते शरद पवारांविरुद्ध (sharad pawar)दंड थोपटले आहे. शरद पवार यांच्यांवर टीका करत रयत शिक्षण संस्थेतील पद सोडण्याची मागणी केली आहे.

 शरद पवार
रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

रयत शिक्षण संस्थेत एकाच कुटुंबातील 9 सभासद झाले आहेत. या संस्थेचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न आहे का? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या संस्थेचं अध्यक्षपद सोडावं," अशी मागणी शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. ते म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतची घटना लिहिली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे अशी तरतूद केली होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली. नंतर या संस्थेत राजकीय व्यक्तींचा प्रवेश झाला आणि आता ती त्यांच्याच ताब्यात गेली आहे. रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावण्यासाठी खुलेआम ४० लाख रुपये मागितले जात आहेत,” असा आरोपही महेश शिंदे यांनी केला. रयतची अनेक कामे ठराविक लोकांनाच दिली जातात. पेंटिंगचे काम वर्षानुवर्षे बारामतीच्या एकाच व्यक्तीला दिले जाते. सातारा जिल्ह्यात पेंटर नाहीत का, असा सवाल त्यांनी केला.

 शरद पवार
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

पात्रता नसलेल्यांना मंडळावर घेतले

रयत शिक्षण संस्थेचं खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही, अशा लोकांना रयतच्या मंडळावर घेतलं जातं याचं दुःख वाटतं.

खासदार उदयनराजे भोसले यांना 'रयत'च्या संचालक मंडळावर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. राजकीय बळाच्या जोरावर ही संस्था काही राजकारण्यांच्या ताब्यात गेली आहे. हे चुकीचे आहे. राजघराण्याने त्यांच्या मालकीची जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. त्यामुळं राजघराण्यातील उदयनराजेंना रयतच्या संचालक मंडळावर घेण्यात यावं, अशी मागणी महेश शिंदे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.