Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना नेता म्हणाला, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगल्या पद्धतीने सांभाळतील

शिवसेना नेता म्हणाला, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगल्या पद्धतीने सांभाळतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)आजारी असून, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित नव्हते. यावरून विरोध पक्षाने जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांचा अन्य नेत्यांवर विश्वास नसेल, तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी वहिनींकडे (Rashmi Uddhav Thackeray)द्यावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)म्हणाले होते. हाच धागा पकडत आता शिवसेनेच्या एका नेत्याने, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतील, असे म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

- Advertisement -

शिवसेना नेते अब्दुल सत्तार (abdul sattar)म्हणाले, रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात. त्यांची काम करण्याची पद्धत उत्कृष्ट आहे. त्या एक अभ्यासू महिला आहेत. आज त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती आहे. कारण त्या साहेबांच्या सोबत राहतात. आदित्य साहेब कसे काम करतात, मोठे साहेब कसं काम करतात, या सर्वांच्या पेक्षा एक महिला म्हणून त्यांचं नियोजन कसं असतं, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचं बळकटीकरण कसं व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मुल न करता, त्यांना सक्षम कसं करायला पाहिजे यासाठी ताईसाहेबांचं काम मोठं आहे. उद्धव साहेबांचा आदेश असेल तर मला वाटतं काहीही होऊ शकतं. मला वाटतं त्यांच्यावर जबाबदारी देऊही शकतात. त्या सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही उत्तम काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे. राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे.

गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

गडकरीच भाजप-सेना युती करु शकतात

नितीन गडकरी साहेब हे राजकारणातील चालतं-बोलतं विद्यापीठ आहे. त्यांनी एकदा ठरवलं पुल बनवण्याचं तर कुठेही कसाही पुल बनवणे, कशामुळे जोडणे, कशाप्रकारे जोडणे, हे त्यांना चांगलं माहिती आहे. भाजप-शिवसेनेचा पुल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव साहेबांकडे जातील, उद्धव साहेबांना विनंती करतील. कारण हा निर्णय उद्धवसाहेबच घेऊ शकतात, असं मतही सत्तार यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या