Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या55 चे 110 आमदार करण्याची धमक शिवसेनेतच

55 चे 110 आमदार करण्याची धमक शिवसेनेतच

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत ताकद दाखवून दिली आहे. राज्यात कोणाला हरवू शकतो आणि जिंकूही शकतो, हे शिवसेनेने दाखवून दिले आहे.

- Advertisement -

मुंबई, कोकणनंतर शिवसेनेचा जळगाव जिल्हा बालेकिल्ला झालेला आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना भक्कम आहे. विधानसभेत 55 आमदार असून भविष्यात 110 आमदार करण्याची धमक शिवसेनेतच आहेत, अशी माहिती शिवसेना संपर्कप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांसह जिल्हा परिषदेच्या सदस्य, सभापती, जिल्हाप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुखांच्यां बैठकीनंतर शनिवारी हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. राऊत पुढे म्हणाले की, जळगाव लोकसभेवर देखील जळगावातील खासदार जावून भगवा फडकवा, असे मला देखील वाटते. राज्याचं नेतृत्व शिवसेनेकडे असावं. बाकी सगळ्यांना भूगोल आहे. मात्र, महाराष्ट्रला इतिहास आहे.

कारण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी इतिहास घडविलाय. आता 55 आमदारांची ताकद ही भविष्यात 110 करण्याची धमक असून सगळे आमदार व्यासपीठावर असतील, तर जळगाव लोकसभेचा शिवसेनेचा खासदार राहील, असे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी शिवसैनिकांनी संघटना वाढीसाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावणार

जळगावचे धुळगाव झालं होत पुन्हा जळगाव करणार असून खा.संजय राऊत हे आत्मविश्वास असलेले व्यक्तिमत्व आहे. लोक म्हणतात तीन तिघडा काम बिघाड. पण आपण हे काम यशस्वी करून दाखवलं. महाविकस आघाडी सरकार स्थापनेसाठी लढा दिला. जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावणार असून जळगाव लोकसभेचा खासदार शिवसेनाचाच राहणार असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

मी पुन्हा येईन…

विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन, अशी घोषणा करीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता शिवसेनेला संपविण्याचे काम सुरु केले जात होते. मात्र, शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत ताकद दाखवून दिली आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेनेत गटबाजी नाही

भाजपचे अजून काही नगरसेवक वेटिंग आहेत. इन्कमिंग नगरसेवकांच्या प्रवेशाच्या वेळी पालकमंत्र्यांना अंधारात ठेवले होते, असा प्रश्न उपस्थित केला असता,त्यावर खा.राऊत म्हणाले की, पालकमंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांसह शिवसेना संपर्कप्रमुखांना जळगाव महापालिकेत लवकरच सत्तांतर होईल,अशी माहिती दिली. मग जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अंधारात कसे असतील? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही. नतून कार्यकर्त्यांना संधी देवून जबाबदार्‍या देण्याचे काम शिवसेना करीत आहे,असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचा पाठपुरावा

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून मराठा आरक्षणाविषयी साकडे घातले आहे. याविषयावर भाजपाकडून दिशाभूल होत आहे का? त्यावर खा.राऊत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,त्यासाठी शिवसेनेचा पाठपुरावा सुरुा आहे. मात्र, हा प्रश्न केंद्राकडे असल्याने मराठा समाजाने समजून घेतले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

मोदींना रोखण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोटबांधणी

मोदींना रोखण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधणी केली जात आहे. इतर घटकपक्षांनी एकत्र येण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यात काँग्रेस पक्षाशी युती आहे. सध्या काँग्रेस कमकुवत असली तरी विरोधी पक्षांची आघाडी काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्र, आसाम, केरळ,कर्नाटक आदी ठिकाणी काँग्रेस मजबूत आहे.

स्वबळावर आगामी निवडणुका

महापालिका, विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सोसायट्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा नारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या