Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना हेच लक्ष्य?

शिवसेना हेच लक्ष्य?

मुंबई /पुणे । प्रतिनिधी Mumbai/ Pune

मशिदीवरील भोंगे( Loudspeakers on Masjids ) आणि हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa )पठणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना आज, रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा होत आहे( Public Meetings of MNS & BJP ). या दोन्ही सभांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्थात शिवसेनेला ( Shivsena )लक्ष्य केले जाण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

मनसेना राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेसाठी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. ठाण्यातील उत्तर सभेनंतर राज औरंगाबादला काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण 3 मे नंतर म्हणजे रमजान ईद झाल्यावर मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या इशार्‍याची मुदत दोन दिवसात संपणार आहे. त्यामुळे राज आजच्या सभेत आणखी कोणता नवा आदेश मनसैनिकाना देतात, याची उत्सुकता आहे.

तर मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र चिंतन, महाराष्ट्र वंदन या कार्यक्रमाचे आज सायनच्या सोमय्या मैदानात आयोजन केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवून शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची तयारी भाजपने केली आहे. शिवाय याच सभेत भाजप मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकून शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या