Saturday, April 27, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर; 'या' आठ जणांना मिळाली...

मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर; ‘या’ आठ जणांना मिळाली संधी

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेची यादी अद्यापही गुलदस्त्यात होती. मात्र, अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशाने शिवसेनेच्या (Shivsena) आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

या यादीत नाशिकच्या (Nashik) जागेचा समावेश नसून उत्तर महाराष्ट्रातील फक्त शिर्डीच्या जागेचा समावेश आहे. तर ठाण्यावर भाजपने (BJP) तर नाशिकवर राष्ट्रवादीने (NCP) दावा केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीमध्ये रामटेकमधून राजू पारवे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, दक्षिण-मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे, हिंगोलीतून हेमंत पाटील, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकंणगलेतून धैर्यशील माने, मावळमधून श्रीरंग बारणे तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यातील लोकसभेच्या (Loksabha) ४८ जागांपैकी भाजपने सर्वाधिक २४ उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसने १२, शिवसेना ठाकरे गटाने १७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने २ उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या