द्रौपदी मुर्मू यांना शिंदे गटाचा पाठिंबा

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन
द्रौपदी मुर्मू यांना शिंदे गटाचा पाठिंबा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

येत्या 18 जुलै रोजी होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत (presidential election) भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना शिंदे गटाच्या 50 आमदारांचा पाठिंबा राहील, अशी घोषणा शिवसेनेतील बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंगळवारी केली. एक महिला आणि आदिवासी समाजातील पहिला राष्ट्रपती होत असल्याने मुर्मू यांना शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

काल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत बाबत चर्चा केली. यावेळी शिंदे गटाने भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती केसरकर यांनी पत्रकार परिषदघेऊन दिली.

द्रौपदी मुर्मू या लवकरच राज्याच्या दौर्‍यावर येत आहेत. महिला म्हणून दुसर्‍या तर आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती होण्याचा मान मुर्मू यांना मिळणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पाठिंबा दिला होता. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्या आदिवासी महिलेला राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा दिला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला धोरण आणले तसेच महिलांना पुरुषांच्या बरोबरीने पुढे आणण्यासाठी काम केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा मुर्मू यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन केसरकर यांनी केले.

नगरविकासचे 800 कोटी बारामतीला पळवले

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागासाठी तरतूद असलेली 800 कोटी रुपयांची रक्कम एकट्या बारामतीला नेली. 3 हजार 800 कोटी पैकी 2 हजार कोटींहून अधिक रक्कम राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात देण्यात आली. अजित पवारांनी सोमवारी विधीमंडळात कितीही सांगितले तरी मतदारसंघातील विकासनिधी वेगळा असतो आणि थेट विभागाचा असलेला निधी वेगळा असतो. त्यामुळे हाच निधी अजित पवारांनी राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात दिल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com