Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकसाठी शिंदे गटाची कोअर कमिटी गठीत

नाशिकसाठी शिंदे गटाची कोअर कमिटी गठीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिंदे गटात (shinde group) प्रवेश घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्ह्यातील पदाधिकार्‍यामध्ये समन्वयाचा आभाव दिसून येत असल्याने परस्परांचे कटके उडताना दिसू लागले होते.

- Advertisement -

त्यातून नाराजी व गटबाजीची होणारी चर्चा थांबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी नाशिक जिल्ह्यासाठी (nashik district) शिंदे गटाची ‘कोअर कमिटी’ (Core Committee) गठीत केली आहे. ही समिती जिल्ह्यात पक्षाची धोरणे ठरविण्याबरोबरच अन्य पक्षांतून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रवेश घेण्याबाबत निर्णय घेणार आहे. याशिवाय पक्षात पदे वाटप करताना देखील ही समितीची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे.

नाराजी नाट्यामुळे निर्णय

पक्षाचेच आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी मध्यंतरी शिंदे गटात नेमण्यात आलेल्या जिल्हा प्रमुखांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता तसेच खा. गोडसे यांनी सुरू केलेले पक्षाचे कार्यालय शिंदे गटाचे की त्यांचे स्वतःचे असा सवेलही उपस्थित केला होता. कार्यक्रमांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रारही कांदे यांनी केली होती.

दोनच दिवसांपूर्वी स्वः बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पंचवटीतील कार्यक्रमात महिला संघटक असलेल्या पदाधिकार्‍याला डावलून पक्षात नव प्रवेश घेतलेल्या एका महिलेला खा. हेमंत गोडसे (MP Hemat Godse) यांनी परस्पर नियुक्ती दिल्यामुळे जाहीर वाद झाला होता. या सार्‍या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे तसेच पक्षात एकी नसल्याचाही संदेश जात असल्यामुळे ते टाळण्यासाठी आता कोअर ग्रुप तयार करण्यात आला असून या माध्यमातून निर्णय प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

कोअर समितीचे सदस्य

या कोअर समितीत पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse), खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande), जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व जिल्हा संघटक सूर्यकांत लवटे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचा समावेश आहे. त्या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या