Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटातील 'या' दिग्गजांचा पत्ता कट

शिंदे गटातील ‘या’ दिग्गजांचा पत्ता कट

मुंबई । Mumbai

शिंदे – फडणवीस सरकारच्या (Shinde – Fadnavis Government) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आज राजभवनात पार पडला. यामध्ये एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदारांचा समावेश होता. मात्र याचवेळी शिंदे गटात (Shinde group) मंत्रीपदावरून नाराजीनाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे प्रहारचे आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांचाही पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचे समजते…

- Advertisement -

शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराला (MLA) संधी मिळालेली नाही. त्यामुळे महिला आमदारांमध्ये देखील नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तर टीईटी शिक्षक भरती घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलांचे नाव आल्याने ते वादात सापडले होते. मात्र आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमध्ये (MahaVikas Aghadi Government) मंत्री राहिलेले आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने शिंदे गटात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंगल्यावर शिंदे गटातील आमदारांची बैठक झाली होती. यामध्ये अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली होती. यात आमदार सुहास कांदे (Suhas Kande) भरत गोगावले (Bharat Gogawle) बच्चू कडू, सदा सरवणकर (Sada Saravankar) मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासह अनेक आमदारांचा सामावेश होता.तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक आमदारांना संधी न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारात या आमदारांना संधी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या