शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात केली 'ही' मागणी

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात केली 'ही' मागणी

नवी दिल्ली | New Delhi

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे शिवसेना (Shivsena) कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहचले असून या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी झाली. यानंतर घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलत २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होईल असे स्पष्ट केले...

घटनापीठासमोर शिंदे गटाकडून (Shinde group) नीरज कौल (Neeraj Kaul) यांनी तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तिवाद केला. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी केली.

तर याआधी शिंदे गटाने शिवसेना पक्षावर आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आपला हक्क असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. याला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत या प्रकरणी निवडणूक आयोगाला (Election Commission) निर्णय घेण्यापासून रोखावे अशी मागणी केली होती. या सुनावणीनंतर आता निवडणूक आयोग या प्रकरणात निर्णय घेऊ शकणार की नाही हे २७ सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

तसेच निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray group) कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. यासंदर्भात आयोगाने शिवसेनेला २३ सप्टेंबपर्यंत मुदत दिली आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या आमदारांच्या (MLA) अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी 'मूळ शिवसेना आमचीच' असल्याचा दावा करत शिंदे गटाने 'धनुष्यबाण' या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर हक्क सांगितला आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्जही केला आहे. पण, निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com