शिंदे गटाला केंद्राकडून मिळणार 'हे' मोठे गिफ्ट

शिंदे गटाला केंद्राकडून मिळणार 'हे' मोठे गिफ्ट

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी करून भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारला (Shinde and Fadnavis Government) ४ महिने पूर्ण होत असून आता लवकरच शिंदे गटाला केंद्रातून २ मंत्रिपद आणि २ राज्यपालपद मिळण्याची शक्यता आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्याकडे मागणी केली आहे. या मागणीवर आज अमित शहा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिंदे गटाला केंद्राकडून मिळणार 'हे' मोठे गिफ्ट
एसबीआयने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात केला 'हा' मोठा बदल

दरम्यान, याआधीही शिंदे गटाने (Shinde Group) केंद्राकडे मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे गटाने भाजपकडे तशी मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com