Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 'या' खासदाराने दिला राजीनामा; थेट लोकसभा अध्यक्षांना...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ‘या’ खासदाराने दिला राजीनामा; थेट लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. तर काही गावांमध्ये (Villages) राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच आता मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी शिंदे गटाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी राजीनामा दिला आहे….

- Advertisement -

Maratha Reservation : ” ‘माझा आवाज चालू आहे, तोपर्यंत…”; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन

खासदार पाटील यांना मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करावी यासाठी काही आंदोलक भेटले असता त्याठिकाणी आंदोलकांनी पाटील यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा (Resignation from MP Post) द्या अशी मागणी केली. त्यानंतर खासदार हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.

Maharashtra News : सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल रमेश बैस यांची भेट; कारण काय?

त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात (Maharashtra) मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे खासदार हेमंत पाटील पत्रात म्हणाले आहेत.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण; खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती

दरम्यान, दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारसोबत चर्चेची दारं खुली केली आहेत. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘दोन दिवस मी बोलू शकतो, त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचं ते बोला, नाहीतर परिस्थिती अवघड होईल, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे म्हणत त्यांनी सरकारला चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नांदगाव तालुक्यात मोठी कारवाई; देहव्रिक्री रॅकेटचा पर्दाफाश

- Advertisment -

ताज्या बातम्या