Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई |Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) फुट पडून दोन गट पडले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर इतर पक्षातील आमदार, खासदार, मंत्री, नेते, कार्यकर्ते हे पक्षांतर करत असून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच एकीकडे शिंदे गटात जोरदार इनकमिंग असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे…

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्त्रार केला होता. त्यावेळी शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter Session) दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराची शक्यता वर्तविण्यात येत होती. पंरतु, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच आता आमदार मिटकरी यांनी शिंदे गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे विधान केले आहे.

ते म्हणाले की, शिंदे गटातील तीन व भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) केला जात नसल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच त्या आमदारांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदारांवर विश्वास असता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार केला असता. विस्ताराच्या दिवशी सरकार कोसळेल असे देखील मिटकरींनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या