Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या'अंगावर आले तर शिंगावर घेऊ'; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा

‘अंगावर आले तर शिंगावर घेऊ’; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर राज्याचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात मागील तीन दिवसांपासून विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते.

- Advertisement -

त्यानंतर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण झाले होते. आमदारांच्या या अभूतपूर्व राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार (Shinde group MLA) भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना विरोधकांना इशारा दिला आहे…

यावेळी गोगावले म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमच्या नादी लागू नका आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही. मात्र, आमच्या अंगावर आला तर आम्ही त्याला शिंगावर घेऊ असे म्हणत पिक्चर अभी बाकी है! हा फक्त ट्रेलर आहे असा थेट इशारा विरोधकांना दिला आहे. तसेच ते आमच्या अंगावर आले नाही त्यांच्या अंगावर आम्ही गेलो होते, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘आज शिवसेना-भाजप (Shivsena and BJP) युतीच्या माध्यमातून आम्ही विरोधकांविरोधात आंदोलन केले, मागील तीन दिवसांपासून ते आमच्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत. आम्हाला गद्दार गद्दार म्हणात आहेत. जे आम्ही केले नाही ते आरोप आमच्यावर करत आहेत. मात्र, आम्ही सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना आमचे बोलणे झोंबले कारण आम्ही त्यांचा खरा इतिहास काढला असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या