Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र; केली 'ही' मागणी

शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ मागणी

नवी दिल्ली । New Delhi

शिवसेनेचे (Shivsena) आमदार (MLA) आणि खासदार (MP) फोडून एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पण, शिवसेना कुणाची हा प्रश्न उपस्थितीत झाला असून आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होत आहे. मात्र याआधीच शिंदे गटाने (Shinde Group) निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह पत्र आयोगाला देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनाच काबीज करण्याचा प्रयत्न आता शिंदे गटाकडून होणार आहे…

- Advertisement -

शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नियुक्त केलेल्या शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी एकत्र येऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केली असल्याचे सांगितले आहे. तसेच सोमवारी एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी (National Executive) घोषित करण्यात आली होती.

तर शिवसेना खासदारांचा एक गट सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आधी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांची पक्षाचे ‘मुख्य नेते’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

तसेच काल शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले होते. या पत्रात राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची लोकसभेत गटनेता म्हणून तर भावना गवळी (Bhavna Gawli) यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या