Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याRamdas Kadam : "गजाभाऊ तुमच्या रक्तात भेसळ, पुत्रप्रेमासाठी पक्षाशी..."; रामदास कदमांनी कीर्तिकरांना...

Ramdas Kadam : “गजाभाऊ तुमच्या रक्तात भेसळ, पुत्रप्रेमासाठी पक्षाशी…”; रामदास कदमांनी कीर्तिकरांना पुन्हा डिवचलं

मुंबई | Mumbai

शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजनान कीर्तिकर (MP Gajnan Kirtikar) आणि नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे ऐन दिवाळीत (Diwali) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फोडतांना दिसत आहेत.कीर्तिकर आणि कदम यांच्यामध्ये मुंबईच्या (Mumbai) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून हे आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधी खासदार गजानन कीर्तिकरांनी प्रेसनोट प्रसिद्ध करून त्यात रामदास कदमांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून केला होता. त्यानंतर आता रामदास कदमांनी कीर्तिकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देत कीर्तिकर भ्रमिष्ट झाले असून त्यांना डॉक्टरांची गरज आहे, असे म्हणत टीकास्त्र सोडले आहे…

- Advertisement -

Video : मालेगावात टायगर-३ च्या प्रदर्शनावेळी सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके

यावेळी बोलतांना रामदास कदम म्हणाले की, “सध्या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) दिवाळीतच शिमगा बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांमध्येच फटाके फुटत आहेत. हे चित्र दुर्दैवी असून हा बेशिस्तपणा असल्याचे म्हणत गजाभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती” असा टोला कदम यांनी लगावला आहे. तसेच गजानन कीर्तिकरांना पाडण्याचा मी १९९० मध्ये प्रयत्न केला होता. हा आरोप पूर्णपणे खोटा असून माझ्या बदनामीसाठी हे कटकारस्थान रचले जात असून ९० मधील निवडणुकीची त्यांना आत्ता ३० वर्षानंतर आठवण आली का?” असा सवालही रामदास कदमांनी उपस्थित केला आहे.

Maratha Reservation : ऐन दिवाळीत आणखी एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी संपवलं जीवन

कदम पुढे म्हणाले की, कीर्तिकर पक्षासोबत गद्दारी करत आहेत. गोरेगाव येथील कार्यालयात वडिल आणि मुलगा एकाच कार्यालयात बसत आहेत. आपला खासदारकीचा निधी मुलाला विकासकामे करण्यासाठी देत आहेत. कदम यांना कसं बदनाम करायचे हे आमच्या पक्षातील एक ज्येष्ठ नेता करत असून कीर्तिकरांच्या रक्तात भेसळ असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच गजाभाऊंचे आता वय झाले असून त्यांना डॉक्टरांची गरज आहे. पक्षाच्या नेत्याविरुद्ध बोलण्याआधी त्यांना पक्षप्रमुखांसोबत चर्चा करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी थेट निवेदन जारी करत बेछुट आरोप केले आहेत, असेही कदमांनी म्हटले.

Sanjay Raut : “तेव्हा तुमचा बार वरून उडेल का खालून ते…”; ‘त्या’ टीकेवरून राऊतांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

तसेच अनंत गीतेंनी मला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने गुहागरमधून पाडले. त्यामुळे ज्या गीतेंनी मला पाडले त्याचा प्रचार करणार नाही असे म्हटले. त्यावेळी मला राज्यात इतरत्र पाठवण्यात आले. गद्दारी मी नाही करत तुम्ही करत आहात. तुमचे पितळ उघडे पडले म्हणून तुमचे पित्त खवळले असल्याची बोचरी टीकाही कदम यांनी कीर्तिकरांवर केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : दारणा नदीच्या पात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या