Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाच्या 'या' नेत्याचा आदित्य ठाकरेंवर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंवर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा (scam) आरोप केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेचे (shivsena) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे (Pollution Control Corporation) शंभर कोटी रुपये घेतले, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे चौकशीसाठी पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. तर शंभर खोके कुठून घ्यायचे हे त्यांना माहित असून कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा शंभर खोके घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये असेही कदम म्हणाले.

तसेच अडीच वर्षात मी पर्यावरण मंत्री असतांना मला काका काका म्हणून आदित्य ठाकरे जवळ आले. पर्यावरण खात्याचे (Environment Department) काम समजून घेतले आणि नंतर माझ्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःपर्यावरण मंत्री बनून माझ्या खुर्चीत बसले, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या