शिंदे गटाकडून गुवाहाटीसाठी 'हे' विशेष विमान बुक

शिंदे गटाकडून गुवाहाटीसाठी 'हे' विशेष विमान बुक

मुंबई | Mumbai

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत (Shivsena) केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे ४० आमदारांना (MLA) घेऊन प्रथम सुरतला (Surat) गेले. यानंतर त्यांनी या आमदारांना घेऊन थेट गुवाहाटी (Guwahati) गाठली. त्यावेळी शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांच्या 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल' या डायलॉगमुळे गुवाहाटी चर्चेत आली होती...

त्यानंतर राज्यात सत्तास्थापन केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) दर्शनाला जाणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता शिंदे आपल्या आमदार, खासदारांच्या कुटुंबियांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा निश्चित झाल्यानतंर आता यासाठी एअर इंडियाचे (Air India) विशेष विमान (Plane) देखील बुक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दौऱ्यातील आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबिय अशा १८० जणांसाठी विशेष विमान बुक करण्यात आले आहे. २६ आणि २७ नोव्हेंबर असा दोन दिवसांचा हा गुवाहाटी दौरा असणार आहे.

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे (Shinde Group) गुवाहाटीत जंगी स्वागत करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com