शिंदे सरकार केव्हाही कोसळेल!

राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसेंचा पुन्हा दावा
शिंदे सरकार केव्हाही कोसळेल!

जळगाव jalgaon।

शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde on Fadnavis Govt) अजूनही न्यायालयाच्या (court) निकालाची (result) टांगती तलवार आहे. कोर्ट काय निकाल देते त्यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यात मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता जर वाढली तर सरकार कधीही कोसळेल (collapse anytime) असा दावा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे ()NCP leader MLA Eknathrao Khadse यांनी आज येथे केला.

एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधतांना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. खडसे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांनी याविषयी उघडपणे सांगितलं आहे.

अब्दुल सत्तारांनी आता हे नेमके कोण आहेत तेदेखील स्पष्ट सांगून टाकावे. त्यांच्या विरोधात जे षडयंत्र झाल्याचे म्हणत आहेत त्यांची नावे त्यांनी जाहीर करावीत असे आव्हानही आ. खडसे यांनी मंत्री सत्तार यांना दिले आहे. असा दावा एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार जास्तच अडकले.

त्यानंतर अधिवेशनात आपल्याला अडकवणारे आणि बदनाम करणारे आपल्याच पक्षातले आहेत असे म्हटले होते. हाच धागा घेऊन आ. एकनाथराव खडसे यांनी हे मोठे विधान केले आहे.

संजय राऊतांचेही भाकीत

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राजकीय फटाके फुटत आहेत. खडसेंप्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याबाबत भाकीत केले आहे. खा.संजय राऊत यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत राज्यातील हे सरकार अनैतिक असून ते फेब्रुवारीच्या आत पायउतार होईल असे वक्तव्य केले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही असाच दावा केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com