शिंदे-फडणवीसांचा शपथविधी असंवैधानिक? राजभवनाकडून धक्कादायक खुलासा

शिंदे-फडणवीसांचा शपथविधी असंवैधानिक? 
 राजभवनाकडून धक्कादायक खुलासा

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंड केल्यापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू असून ठाकरे गटाने (Thackeray Group) शिंदे-फडणवीस सरकारच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंतर सध्या हे प्रकरण घटनापीठासमोर असून त्याच्यावर सुनावणी सुरु आहे. त्यातच आता राज्यात सत्तेत असलेले शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) असैविधानिक असल्याचा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारातून (Right to Information) समोर आला आहे. त्यामुळे आता यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंड केल्यानंतर शिवसेनेतील ४० आणि इतर अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपच्या (BJP) पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे गटाने या सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती.

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोशयारींना (Governor Bhagat Singh Koshayari) कोणतेही पत्र अथवा निमंत्रण दिलेले नव्हते, असा धक्कादायक खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिंदे-फडणवीस सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला असून राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना पदाची शपथ कशी दिली? ही शपथच असंवैधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com