...तर शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होईल : जयंत पाटील

...तर शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होईल : जयंत पाटील

मुंबई | Mumbai

भाजपच्या (BJP) गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) बरखास्त होईल. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना कळेल की आपण किती मोठी चूक केली असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP state president) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे...

ते पुढे म्हणाले की, हे सरकार टिकणार नाही, म्हणूनच प्रशासनसुद्धा सरकारचं ऐकत नाही. या सरकारची प्रशासनावरची पकड मजबूत नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) फक्त ४० मतदार संघापुरत्या विविध घोषणा करत आहेत. उरलेल्या मतदारसंघाचे काय? कोणत्याही घोषणेचे जी आर नाहीत तसेच आदेशही नाहीत. तर शिंदे लिखित भाषण वाचतात, असे त्यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, स्थानिक नेत्यांना काँग्रेस आणि शिवसेना (Congress and Shiv Sena) नेत्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले असून तिन्ही पक्ष कुठे एकत्रित लढतील याबद्दल स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com