खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस सरकारमधील 'हे' मंत्री नाराज?

खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस सरकारमधील 'हे' मंत्री नाराज?

मुंबई | Mumbai

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार (Shinde - Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) करण्यात आला. त्यानंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप (Portfolio Allocation) कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालयाकडून (Chief Minister Office) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे खातेवाटपाची यादी पाठविण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालांनी या यादीला अंतिम मंजुरी दिल्यावर खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात अनेक धक्कातत्रांचा वापर झाल्याचे पाहायला मिळाले असून यावरून शिंदे - फडणवीस सरकारमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे.

नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या खातेवाटपात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य या खात्यांवर समाधान मानावे लागले आहे. तर काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना महसूल खाते देण्यात आले आहे.

२०१४ सालच्या शिवसेना - भाजप सरकारच्या (Shiv Sena-BJP Government)कालावधीत हे खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. चंद्रकांत पाटील महसूल खाते मिळावे यासाठी आग्रही होते. मात्र भाजपने हे खाते त्यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटातील (Shinde Group) मंत्र्यांमध्ये देखील खातेवाटपावरून नाराजी रंगण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे गटातील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले होते. पंरतु शिंदे - फडणवीस सरकारमध्ये त्यांना बंदरे व खनिकर्म हे खाते मिळाल्याने ते नाराज असण्याची शक्यता आहे. तसेच उदय सामंत (Udya Samant) यांना उद्योग खाते मिळाल्याने ते देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com