शिंदे-फडणवीस सरकारचा 'मविआ'ला दणका; 'या' निर्णयाला स्थगिती

File Photo
File Photo

मुंबई | Mumbai

राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आले. त्यानंतर नवीन सरकारने महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला आहे. यामध्ये आता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेचाही (Regional Tourism Development Plan) नंबर लागला आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारने प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ३८ हजार १७० कोटी ७१ लाख रुपयांच्या कामांना मान्यता दिली होती. शिवाय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी (Maharashtra Tourism Development Corporation)संबंधित २१ हजार ४८० कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामांनाही मंजुरी दिली होती. पंरतु, शिंदे-फडणवीस सरकारने या दोन्ही कामांना स्थगिती दिली आहे.

दरम्यान, याआधी शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो कारशेड आरे कॉलनीतच उभारणार, असा निर्णय घेऊन ठाकरे सरकारला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली. यानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांच्या कामांना स्थगिती देत कोट्यावधींचा निधी रोखला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com