Churchgate Hostel Murder Case : सरकार अलर्ट मोडवर; राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांबाबत घेतला 'हा' निर्णय

Churchgate Hostel Murder Case : सरकार अलर्ट मोडवर; राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांबाबत घेतला 'हा' निर्णय

मुंबई | Mumbai

मुंबईतील चर्चगेट परिसरातील (Churchgate Area) मुलींच्या शासकीय वसतिगृहात (Government Hostel) १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह (Young Woman Dead Body) आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आले असून आता राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे...

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना केली असून एका आठवड्यात सर्व शासकीय वसतिगृहांचे ऑडिट केले जाणार आहे. त्यानंतर १४ जूनपर्यंत आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.

Churchgate Hostel Murder Case : सरकार अलर्ट मोडवर; राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांबाबत घेतला 'हा' निर्णय
Union Cabinet : मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; 'या' खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ

तसेच या घटनेप्रकरणी पोलिसांनी (Police) आतापर्यंत वसतिगृहातील ७ ते ८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. तर पीडित राहत असलेल्या चौथ्या मजल्यावर सीसीटीव्ही आहे, मात्र तो बंद होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तसेच वसतिगृहातील कित्येक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचे देखील तपासात समोर आले आहे.

Churchgate Hostel Murder Case : सरकार अलर्ट मोडवर; राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांबाबत घेतला 'हा' निर्णय
Accident News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; टायर फुटल्याने कार उलटली

तर दुसरीकडे या प्रकरणानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी वसतिगृह प्रशासनाने तिथल्या प्रकाराबाबत कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे या घटनेला वसतिगृह प्रशासनातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांनतर आता संबधित प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com