Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कुणाची बदली कुठे?

राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कुणाची बदली कुठे?

मुंबई | Mumbai

शिंदे- फडणवीस सरकारने राज्यातल्या सनदी अधिकाऱ्यांची (IAS Officers) भाकरी फिरवली आहे. राज्य सरकारने या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत, त्यातच आता २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. दरम्यान या नविन अधिकाऱ्यांमध्ये नाशिकच्या मनपा आयुक्तपदी असलेल्या डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याही नावाचा समावेश आहे.

अदानींची भेट का घेतली? शरद पवार स्पष्टच बोलले

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundvar) यांची पुणे येथील साखर आयुक्तपदी रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली असून ते सध्या मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेलेले आहे. त्यांची गेल्या वर्षी जुलैमध्ये नाशिक येथे बदली करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली होती. पुलकुंडवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, राज्यातील डॅशिंग अधिकारी म्हणून ज्यांची ओळख असणारे तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांची ही बदली करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात त्यांची ही दुसरी बदली असून त्यांची मराठी भाषा विभागात सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

मोठी बातमी! नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

अधिकाऱ्यांची नावे आणि बदली करण्यात आलेली ठिकाणे

१) सुजाता सौनिक – IAS (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

२) एस व्ही श्रीनिवास – IAS (1991) MC, MMRDA, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

३) लोकेश चंद्र – IAS (1993) GM, BEST, मुंबई यांची CMD, MAHADISCOM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

४) राधिका रस्तोग – IAS (1995) यांना PS आणि विकास Commr., नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

५) – I.A.कुंदन, IAS (1996) PS, महिला आणि बाल कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना PS, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

६) संजीव जयस्वाल – IAS (1996) PS, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची VP आणि CEO, म्हाडा, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

७) आशीष शर्मा – IAS (1997) AMC, BMC, मुंबई यांना PS(2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

८) विजय सिंघल – IAS (1997) CMD, MAHADISCOM, मुंबई यांची GM, BEST, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

९) अंशु सिन्हा – IAS (1999) CEO, M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१०) अनुप कृ. यादव -IAS (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

११) तुकाराम मुंढे – IAS (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१२ ) डॉ. अमित सैनी- IAS (2007) CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१३) चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (2008) एमसी, नाशिक एमसी, नाशिक यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१४) डॉ. माणिक गुरसाल- IAS (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची CEO, Mah.Maritime Board, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१५) श्रीमती कादंबरी बलकवडे, IAS (2010) MC, Kolhapur MC, Kolhapur यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१६) श्री प्रदिपकुमार डांगे- IAS (2011) Jt.Secy.-c-Mission Director, SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.

१७) शंतनू गोयल- IAS (2012)Commissioner, MGNREGS, नागपुर यांची नियुक्ती Joint Managing Director, CIDCO, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.

१८) श्री बी. पी. पृथ्वीराज – IAS (2014) Collector, Latur यांची Director, Information Technology, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

१९) श्री हेमंत वासेकर – IAS (2015) CEO, NRLM, Mumbai यांची Commissioner, Animal Husbandary, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

२०) श्री सुधाकर शिंदे- IRS (1997) यांची AMC, BMC, Mumbai नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या