शिंदे-फडणवीस सरकारचा लव्ह जिहादविरोधात मोठा निर्णय

File Photo
File Photo

मुंबई | Mumbai

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) लव्ह जिहादविरोधात (Love Jihad) विविध जिल्ह्यांत विराट मोर्चे काढले जात असून राज्यातही लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) लव्ह जिहादविरोधात मोठा निर्णय घेतला आहे...

राज्य सरकारने आंतरधर्मीय प्रेमप्रकरणात (Interfaith Love Affair) कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याची माहिती ही समिती घेणार आहे. तसेच पुढील सात दिवसांत १० सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असून या मुलींशी समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर (Shraddha Walkar Murder Case) राज्य सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा (Anti-Love Jihad Act) आणण्याच्या हालचाली सुरु केल्याचे बोलले जात असून त्याअगोदर विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com