मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला; अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री, चंद्रकात पाटलांची उचलबांगडी

मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला; अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री, चंद्रकात पाटलांची उचलबांगडी

मुबंई | Mumbai

गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार (Shinde-Fadnavis-Pawar) यांच्या सरकारमधील रखडलेल्या पालकमंत्रीपदाचा (Guardian Minister) तिढा अखेर सुटला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे....

मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला; अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री, चंद्रकात पाटलांची उचलबांगडी
MLA Disqualification Case : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली; नेमकं कारण काय?

पुणे (Pune) जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पंरतु, राज्य सरकारमध्ये कालपर्यंत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते. जे आज पुन्हा अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्रिपद राखले आहे. त्यामुळे अजित पवार हेच पुण्याचे कारभारी ठरले आहेत.

मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला; अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री, चंद्रकात पाटलांची उचलबांगडी
Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता 'या' तारखेला होणार सुनावणी

आज राज्य सरकारकडून राज्यातील बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळाले आहे.

पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे

पुणे - अजित पवार

अकोला - राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर - चंद्रकांत दादा पाटील

अमरावती - चंद्रकांत दादा पाटील

भंडारा - विजयकुमार गावित

बुलढाणा - दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर - हसन मुश्रीफ

गोंदिया - धर्मरावबाबा आत्राम

बीड - धनंजय मुंडे

परभणी - संजय बनसोडे

नंदूरबार - अनिल भाईदास पाटील

वर्धा - सुधीर मुनगंटीवार

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com