अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रासह सप्तशृंगीचरणी लिन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रासह सप्तशृंगीचरणी लिन

सप्तशृंगीगड | इम्रान शाह

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) व पती राज कुंद्रा (Raj Kundra)यांनी आज (दि ०४) दुपारी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. शिल्पा शेट्टी गडावर आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने मोठ्या संख्येने चाहत्यांनी त्यांना पाहण्यसाठी गर्दी केली होती..

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रासह सप्तशृंगीचरणी लिन
Visual Story : सप्तश्रुंगी गडावर तोंडाचा मास्क उतरवला अन् दिसली 'शिल्पा शेट्टी'

पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी राज कुंद्रा गेल्या वर्षी अडचणीत आले होते. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. कारागृहातून बाहेर पाऊल टाकताच भावनिक झालेले राज कुंद्रा यांना अश्रू अनावर झाले होते.

यानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना हिमाचल प्रदेशात स्पॉट करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शत्रुनाशिनी माँ बगलामुखी मंदिर बनखंडी येथे त्यांची एकत्र पूजा केली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत चामुंडा देवी मंदिर (Chamunda Devi Temple) आणि ज्वालामुखी मंदिरात (Jwalamukhi Temple) जाऊन दर्शन घेतले होते.

आज शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सप्तशृंगीचरणी लिन झाले. यावेळी ग्रामपंचायत व सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सुरुवातीला मास्क घातलेले असल्यामुळे शिल्पा शेट्टी ओळखून आल्या नाहीत. मात्र, मास्क काढल्यावर सर्वत्र शिल्पा शेट्टी गडावर आल्याची वार्ता पसरल्याने त्यांच्याभोवती चाहत्यांनी भक्तनिवास परिसरात विळखा घातला होता. यावेळी वाढलेली गर्दी पोलिसांनी दूर केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com