Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदेशात लसींचे उत्पादन वाढणार : आता Sputnik V ही कंपनी भारतात बनवणार

देशात लसींचे उत्पादन वाढणार : आता Sputnik V ही कंपनी भारतात बनवणार

मुंबई

भारतात कोवॅक्सिन Covaxine व कोविशिल्ड यांच्या व्यतिरिक्त रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीलाही केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. भारतात डा रेडीज लॅबोरटरीने स्पुटनिक व्ही चे उत्पादन करणार आहे. देशातील ६ कंपन्यांशी स्पुटनिक लस भारतातच बनविण्याबाबत चर्चा सुरू आहे. आता रेडीज लॅबोरटरी पाठोपाठ शिल्पा मेडिकेअर कंपनीला ही जबाबदारी मिळाली आहे. यामुळे भारतात लसीचे उत्पादन वाढणार आहे.

- Advertisement -

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

‘शिल्पा मेडिकेअर’ ही भारतीय कंपनी येत्या १२ महिन्यांत रशियन कोविड लस ‘स्पुटनिक व्ही’च्या ५० दशलक्ष डोसची निर्मिती करणार आहे. ‘शिल्पा मेडिकेअर’द्वारे सिंगल डोस ‘स्पुटनिक व्ही लाईट’ची निर्मितीची शक्यताही तपासली जाणार आहे. शिल्पा मेडिकेयरने शेयर बाजारात ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की ‘‘कंपनीने आपली सहायक कंपनी शिल्पा बायोलॉजिकल प्राइवेट लिमिटेड (एसबीपीएल) च्या माध्यमातून डॉ रेडीज लॅबोरटरीसोबत तीन वर्षांचा करार केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या