शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

मुंबई | Mumbai

शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे (Keshavrao Dhondge) यांचं निधन झालंय. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं. केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

तीन महिन्यांपूर्वीच विधीमंडळात केशवराव धोंडगे यांचा गौरव करण्यात आला होता. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभेत त्यांची भाषण त्या काळात प्रचंड गाजली होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com