शेअर बाजार गडगडला! Sensex १ हजार अंकांनी कोसळला

शेअर बाजार गडगडला! Sensex १ हजार अंकांनी कोसळला
शेअर बाजार

मुंबई l Mumbai

शेअर बाजारात आज सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. गेल्या दोन वर्षांपासून सर्वच क्षेत्रांमध्ये परिणाम घडवून आणणाऱ्या करोनाच्या एका नव्या व्हेरिएंटमुळे सेन्सेक्स शुक्रवारी गडगडला.

आज सकाळी, सेन्सेक्समध्ये ५४१ अंकांनी घसरण होऊन ५८,२५४.७९ अंकांवर सेन्सेक्स सुरू झाला. त्यानंतरही घसरण वाढत चालली आहे. त्यानंतर सेन्सेक्स ११०९ अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्सने ५७,७२७.५२० अंकावर गेला होता. सेन्सेक्सच्या या उलट प्रवासामुळे गुंतवणूकदारांचं तब्बल ६ लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

तर, दुसरीकडे निफ्टीमध्येही घसरण दिसून आली.आज निफ्टी १९८ घसरणीसह १७,३३८.७५ अंकावर सुरू झाला. त्यानंतर निफ्टीत घसरण होऊन १७,१७७.०५ अंकापर्यंत कोसळला. निफ्टीमध्ये जवळपास ३५९ अंकाची घसरण दिसून आली.

आज फार्मा शेअर वगळता निफ्टीचे सगळे सेक्टरल इंडेक्स घसरले आहेत. निफ्टी बँक इंडेक्स २.१५ टक्के, प्रायव्हेट बँक २.२७ टक्के, पीएसयू बँक २.५८ टक्के, मेटल इंडेक्स २.४४ टक्के, मीडिया इंडेक्स ३.३९ टक्के, ऑटो इंडेक्स २.४७ टक्क्यांनी घसरले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com