Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशअर्थसंकल्पाच्या दिवशी २४ वर्षांनंतर निर्देशांकात २३१४ अंकांनी वाढ

अर्थसंकल्पाच्या दिवशी २४ वर्षांनंतर निर्देशांकात २३१४ अंकांनी वाढ

नवी दिल्ली

शेअर बाजारात सोमवारी अर्थसंकल्पाचे उत्साहात स्वागत झाले. २४ वर्षांनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २३१४ अंकांनी म्हणजेच ५ टक्के वाढला. निफ्टीतही ६९२ अंकांनी वाढ झाली.यापुर्वी १९९७ मध्ये शेअर बाजारात ६ टक्के वाढ झाली होती.

- Advertisement -

दोन आठवड्यापूर्वी मुंबई शेअर बाजाराने ५० हजारांचा टप्पा पार करत ऐतिहासिक झेप घेतली होती. त्यानंतरच्या आठवड्यात बाजारात पडझड पाहायला मिळाली होती. तर आज अर्थसंकल्पातून विकासाला गती मिळेल या आशेने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आले. बँकींग क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन बँकांचे शेअर चांगलेच वाढले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करत असताना शेअर बाजारात वाढ सुरु झाली. दिवसाअखेर ही वाढ तब्बल २३१४.८४ अंकांनी होते निर्देशांक ४८ हजार ६०० वर पोहचला. निफ्टीही १४,३२८ वर गेला. यापुर्वी १९९७ मध्ये शेअर बाजारात ६ टक्के वाढ झाली होती. आठ महिन्यात निर्देशांक एकाच दिवसात इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाढण्याची ही दुसरी वेळ आहे.

का झाली वाढ?

केंद्र सरकारने पायाभूत सुविधा बरोबरच आरोग्य सुविधा व कृषी क्षेत्रावर गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विकास दराला हातभार लागेल असे गुंतवणूकदारांना वाटते. गुंतवणूकदारांनी सोमवारी सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी केली. त्यातल्या त्यात बॅंकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी जास्त झाली. सरकार दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करणार आहे. त्याचबरोबर बँकांना भांडवली मदत म्हणून २० हजार कोटी रुपये देण्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या