Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासत्तांतरानंतर शरद पवार पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर

सत्तांतरानंतर शरद पवार पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या विधानसभा निवडणुकीत (Election) प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील १५ जागांपैकी सर्वाधिक ६ जागा जिंकण्याची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad) हे राज्यातील मविआ सरकार पायउतार झाल्यानंतर प्रथमच दोन दिवसांसाठी नाशिक दौऱ्यावर येत आहेत…

- Advertisement -

शुक्रवारी सायंकाळी ते नाशकात मुक्कामी येणार असून शनिवारी सकाळी धुळ्यातील कार्यक्रमात सहभाग घेऊन पुन्हा रात्री मुक्कामासाठी नाशकात परतणार आहेत. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी महापालिका (Municipal Corporation) व जिल्हा परिषद निवडणूक (Zilla Parishad Election) तोंडावर असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पवार नाशकात येतील. यावेळी माजी आमदार हेमंत टकले (Hemant Takle) तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसोबत शहरातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या