नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले शरद पवार; वाचा सविस्तर

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले शरद पवार; वाचा सविस्तर

पुणे | Pune

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) सर्व काही आलबेल नसल्याचे म्हटले आहे. लोणावळ्यात (Lonavla) बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला....

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर बोलणे टाळले असून त्यांच्यासारख्या लहान माणसावर मी बोलणार नाही असे म्हटले आहे. बारामती (Baramati) येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसे आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो.

शरद पवारांनी यावेळी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या स्वबळाच्या घोषणेवरदेखील प्रतिक्रिया दिली आहे. आपला राजकीय पक्ष मोठा करण्याच्या प्रयत्नात प्रत्येक जण असणार. काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर त्यात काहीही चुकीचे नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष एकत्रित चालवत नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचे कारण नाही. असे शरद पवार म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com