शरद पवारांचे 'त्या' टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले...

शरद पवारांचे 'त्या' टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले...

मुंबई | Mumabi

आजच्या सामनाच्या (Samana Editorial) अग्रलेखातून भाजपसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, ''शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लॅन’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते आणि येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, शरद पवारांच्या खेळीने भाजपाचा ”प्लॅन’ कचऱ्याच्या टोपलीत गेला आणि त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता. पवारांनी ते करण्यास नकार दिला,” असे त्यात म्हटले आहे.

शरद पवारांचे 'त्या' टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले...
Kerala Boat Tragedy : पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, २१ जणांचा मृत्यू... बचावकार्य सुरू

तसेच सामनाच्या अग्रलेखातून शरद पवारांवरही टिकास्त्र सोडण्यात आले आहे, शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे. “पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला आणि प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला,” असं मत सामनातून मांडण्यात आले आहे. त्यावर आता शरद पवारांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांचे 'त्या' टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले...
Video : राजस्थानमध्ये लष्कराचं MIG-21 विमान घरावर कोसळलं

पवार म्हणाले की, सामनाचा आजचा अग्रलेख मी काही वाचला नाही. वाचल्यावर यावर मी माझं मत देईल. सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करत असतो. पण संपूर्ण माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करणं, योग्य राहील. नाहीतर उगीच गैरसमज होतात. माझी खात्री आहे, त्यांची भूमिका ऐक्याला पूरक असेल, असं शरद पवारांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com