Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा

शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट भाजपसोबतच्या सत्तेत सहभागी झाल्याने पक्षातील आणखी संभाव्य फूट टाळण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी रस्त्यावर उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज, शुक्रवारी कोल्हापूरमध्ये सभा घेणार आहेत. या सभेसाठी शरद पवार गटाने जोरदार तयारी केली असून राष्ट्रवादीने वातावरण निर्मितीसाठी सभेचा टिझर समाज माध्यमावर टाकला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून हा टिझर अपलोड करण्यात आला आहे. यावर ‘आपलं नाणं खणखणीत आहे आणि हे नाणं भल्याभल्यांचा आवाज बंद करणार, कारण कोल्हापूरच्या आखाड्यात शड्डू पवार साहेबच ठोकणार!’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

शरद पवार हे येत्या २५ आणि २६ ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांची दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी दिली. पवार यांचे २५ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये दुपारी अडीच वाजता आगमन होईल. तेथून ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन वंदन करणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यानंतर संध्याकाळी पाच वाजता दसरा चौकात त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी शरद पवार यांनी नाशिक आणि बीडमध्ये सभा घेऊन अजित पवार गटाचा समाचार घेतला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या