Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाची लस घेतल्याबद्दल पवारांनी केला खुलासा

करोनाची लस घेतल्याबद्दल पवारांनी केला खुलासा

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी तिथे तयार करण्यात आलेली करोनावरील लस घेतल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु त्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी या सगळ्याना पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

राज्यात काही घडेल यासाठी चंद्रकांत पाटील यांनी साडेचार वर्षे वाट पहावी

शरद पवार यांनी सांगितले की, “मी करोनावरील लस घेतली असे लोक म्हणत आहेत, परंतु ते खरं नाही, सीरम इन्स्टिट्यूटकडे आत्ता रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस आहे. ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील ही लस घेतली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल” असे पवार यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेली भूमिका घृणास्पद

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेबाबत बोलतांना ते म्हणाले की, मला उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेबाबत फारशी माहिती नाही. पण पोलिसांचे वक्तव्य मी ऐकले. पण त्या मुलीची हत्या झाली आणि तिच्या कुटुंबाच्या इच्छेव्यतिरिक्त तिच्यावर अंत्यसंस्कार झाले हे तर खरं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेली भुमिका ही टोकाची आहे, घृणास्पद आहे आणि तितकीच निंदणीय आहे. राहूल गांधी हे एका मोठ्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना त्याठिकाणी जाऊन द्यायला हवे होते. या प्रकरणाबाबत देशभरात उमटलेली प्रतिक्रिया बरोबर आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या