शरद पवारांचे राज्यपालांना खरमरीत पत्र

शरद पवारांचे राज्यपालांना खरमरीत पत्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (mahaharashtra governor Bhagat singh koshyari) यांना पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत.

राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवलं आहे. या पुस्तकाला अभिप्राय देताना खरमरीत पत्र लिहिलं आहे आहे. महत्वाचं म्हणजे शरद पवार यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख करत लिहिलेल्या पत्रासंबंधी टोला लगावला आहे.

काय आहे पत्रात

महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित 'जनराज्यपाल :भगतसिंह कोश्यारी' हे चित्ररूप कॉफी टेबल बुक प्राप्त झाले. वास्तविक भारतीय संविधानात 'जनराज्यपाल' असा नामोल्लेख आढळत नाही. तरीही राज्य शासनाच्या वतीने अशा शीर्षकाचे सुबक छपाई असलेले, आपल्या एका वर्षाच्या मर्यादीत कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक मला पाठवण्यात आले याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

कॉफी टेबल बुकचे अवलोकन केले असता त्यामध्ये आपल्या मर्यादीत कालावधीतील एखाद दुसरा वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यासारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या, मान्यवरांच्या गाठीभेटी, इतर सामाजिक - सांस्कृतिक कार्यक्रम व त्यातील सहभागाची छायाचित्र पाहण्यात आली. तसेच निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद देखील या माहिती पुस्तकात दिसून आली नाही. असो आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवला याबद्दल मी आपला पुनश्च आभारी आहे.

या ठिकाणी शरद पवारांनी खोचकपणे ऐतिहासिक लेखाजोखा असा उल्लेख केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com