राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे मविप्रला दायित्व कमी करण्यासाठी १ कोटी देणगी

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत ॲड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.४) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने मविप्र संस्थेचे दायित्व कमी करण्यासाठी १ कोटीची देणगी शरद पवार यांनी जाहीर करून संस्थेप्रती असलेला जिव्हाळा अधोरेखित केला….

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रा. बाळासाहेब पिंगळे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नूतन सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी,संचालकांचा शरद पवार व छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतांना संस्थेवर ६० कोटी कर्ज आणि इतर देणे ७० कोटी असे १३० कोटीचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांनी चिंता व्यक्त करून संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी संचालक सर्वश्री डॉ.सयाजीराव गायकवाड,रविंद्र देवरे,प्रविण जाधव,लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, संदीप गुळवे,अमित पाटील, डॉ.प्रसाद सोनवणे, रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णा भगत, विजय पगार, रमेश पिंगळे,यांच्यासह संस्थेचे सनदी लेखापाल राजाराम बस्ते,विजय गडाख,अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

दीड कोटी रुपये जमा

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने संस्थेचे दायित्व कमी करण्यासाठी १ कोटीची देणगी शरद पवार यांनी जाहीर करून संस्थेप्रती असलेला जिव्हाळा अधोरेखित केला.संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वत:पासून सुरवात करून आपआपल्या रकमा संस्थेसाठी जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी छगन भुजबळ,दिलीप बनकर,माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येकी ५-५ लाखाची तर देविदास पिंगळे,सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी दुजोरा देत एक लाख रुपये आणि विश्वस्तांनी प्रत्येकी एक लाख-रुपयाची देणगी जाहीर केली.

याप्रमाणे दीड कोटी रुपये जमा झाले.समाजाकडून देणग्या गोळा करून कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. संस्थेच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

स्वतः पवार साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांनी सर्व सभासदांचे विशेष आभार मानले.संस्थेच्या सद्यस्थिती विषयी त्यांनी माहिती जाणून घेत त्यावरील उपाययोजना बाबत माहिती घेतली.सर्व नूतन कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन करत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

– ॲड.नितीन बाबुराव ठाकरे.सरचिटणीस मविप्र समाज नाशिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *