Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदे-शरद पवार भेट

मुख्यमंत्री शिंदे-शरद पवार भेट

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची काल वर्षा निवासस्थानी भेट झाली, त्यामुळं राजकीय कुजबुज सुरु झाली होती. त्यानंतर काही वेळात पवार आणि अदानी यांची भेट झाली, त्यामुळं या चर्चेला उधाण आलं होतं.

- Advertisement -

यानंतर तासाभरातच भाजप नेते आशिष शेलार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर रात्री उशीरा दाखल झाले होते. त्यामुळं आता राजकीय घडामोडींमोडीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.सुमारे 40 मिनीटे या दोन नेत्यांमध्ये खलबतं झाली. भेटीनंतर बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद साधला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना ही सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी आले असल्याचं सांगितलं होतं. अन्य दोन तीन विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आणि या आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. त्यामुळे, शरद पवारांची ही भेट कामानिमित्त असली तर याची राजकीय चर्चा राज्याच्या वर्तुळात होत आहे. या भेटीची अनेक पैलूंनी चर्चा केली जात आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदेश दौर्‍यावर असताना ही भेट होत असल्यानेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भाजप नेते राम कदम यांनी या भेटीबाबत सांगितले की, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. एका पक्षाचा प्रमुख राज्याच्या प्रमुखाच्या भेटीला गेला आहे. त्यामुळे यातून दुसरा काहीही अर्थ नाही. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी व्यक्तिगत कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यातून दुसरा काही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. ही भेट राजकीय नव्हती.

पवार-अदानी यांच्यात चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट झाली होती. यानंतर काही मिनिटांतच पवारांच्या भेटीसाठी उद्योगपती गौतम अदानी त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर गेले. तेथे त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. गौतम अदानी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गौतमी अदानी यांच्यासोबतच्या भेटीचं कारण सांगितलं. सिंगापूरचे काही लोक माझ्याकडे आले होते. काही तांत्रिक मुद्द्यांवर त्यांना उद्योजक गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. गौतम अदानी आणि सिंगापूरच्या शिष्टमंडळाची भेट झाली. तो तांत्रिक विषय आहे. मला त्यातलं जास्त काही समजत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या