राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात

 शरद पवार
शरद पवार

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णायलत दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टि्वट करुन माहिती दिली.

शरद पवार यांना पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान आहे. त्यामुळे पवार यांच्यांवर ३१ मार्चला एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com