Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यात्यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांशी चर्चा न करताच...; शरद पवारांनी व्यक्त केलं...

त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांशी चर्चा न करताच…; शरद पवारांनी व्यक्त केलं मत

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या (shivsena) ४० आमदारांसह बंड केले होते. यानंतर बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारत न घेता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असे म्हणत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच उद्योगपती गौतम अदानी प्रकरण आणि त्याबद्दलच्या आपल्या विधानावर देखील शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे…

जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा वीज पडल्याने जळून खाक

यावेळी ते म्हणाले की, “मुख्यमंत्रीपद हे तीन पक्षांनी एकत्र येऊन तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. राजीनामा देण्याचा निर्णय कोण घेत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण, अन्य सहकारी पक्षांबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेतल्याने दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने तेव्हा ही चर्चा झाली नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.” असे शरद पवारांनी म्हटले.

IPL 2023 : मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयासाठी भिडणार

तसेच पुढे अदानी समूहाच्या जेपीसी चौकशीवर बोलतांना ते म्हणाले की, सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही. मित्राचं मत माझ्यापेक्षा वेगळे आहे. पण आम्हाला यात ऐक्य ठेवायचे आहे. माझं मत मी मांडलं. पण सहकाऱ्यांना वाटत असेल की जेपीसी पाहिले, तर मी त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही पण विरोधकांची एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही. याबाबतीत आम्ही आग्रह धरणार नाही. असे शरद पवारांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या